Thursday 12 July 2018

उम्मेद

सतत ओठांवर हसू असुदे
डोळ्यात उम्मेदीचे आसू असुदे !!
ओघळतील गालांवर अलवार
हर थेंबात नवी स्वप्न वसुदे !!

असूदेत हृदयात विश्वास खरा
जिव्हाळ्याचा ठोका न चुकलेलाच बरा !
मनात कुठेही शंका नको
मनगटात उम्मेदीचा ज्वर असुदे !!

सुंदर मनाशी मैत्री ठेव
निर्जीव जगण्याशी अंतर ठेव !
खूप असुदे आशा-अपेक्षा
स्वतःशी नको स्वतःची उपेक्षा !!

रंगव चिञ जे पुसणार नाही
नसेल रंगीत, पण कधीच रुसणार नाही !!
जुन्या सवंगड्यांशी नाळ तोडू नको
हर छंदाला तान्हाचं सोडू नको !!

No comments:

Post a Comment