Saturday 23 June 2018

एखादी संध्याकाळ असावी

अस नाही वाटत कि एखादी संध्याकाळ असावी,

एकट्याची,
निवांत पहुडलेली,
बाकावर, बाकड्यावर.
नाहीतर उगाच माडीवर..
मैदानी असायला काय हरकते
नाहीतर,
माझ्या खोलितली,
हातातल्या  कॉफीच्या मगाची,
डोळ्यात पुस्तकी अक्षरांची,
थंड-उष्ण हवेची,
निर्विकार मनाची …

कधी असुदे कि दुपट्याची
रस्त्यांवर बागडणारी,
झालाच तर भेळीच्या गाडीवर जमलेली,
नाहीतर नदीच्या काठावर रमलेली,
कशी वाटेल बर तीच, बागेत थांबलेली,
झावळ्यातून कवडश्यात गुंगलेली,
हळूच नकळत निसटून गेलेली …

Wednesday 6 June 2018

थोडक्यात थोडं

थोडं sharing , थोडं bearing !
जमलंच अंधारात तर, थोडंस daring !!

थोडी विचारपूस , थोडी आशा !
तोडक्या रस्त्याशी, नेहेमीच निराशा !!

थोडी गाणी , थोड्या धुणी !
हळव्या मनाच्या, पुसट आठवणी !!

थोडा पाऊस , थोडा चिख्खल !
गालांशी मैत्री , जुनी शक्कल !!

थोडा गारवा , थोडं बिलगून !
टपोरे थेम्ब, थोडे वेचून !!

थोडास सारंच , थोडक्यात थोडाच !
थोडीशी ओढ, मुळात तडजोडच !!